HOME   लातूर न्यूज

फिरत्या स्वच्छतागृहाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा

पालकमंत्री करणार उदघाटन आणि लोकार्पण


फिरत्या स्वच्छतागृहाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा

लातूर: भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून सुरु केलेल्या फिरत्या स्वच्छता गृहाचा लोकार्पण सोहळा गुरुवार ०६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता शहरातील गांधी चौकात आयोजित करण्यात आला आहे. या स्वच्छतागृहाचे उद्घाटन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. भारत विकास परिषद ही देशपातळीवर समाजकार्य करणारी अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. डिसेंबर २०१६ मध्ये या संस्थेची शाखा लातुरात सुरु करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम या संस्थेच्या वतीने राबविले जात आहेत. आज लातूर शहरांत सर्वांना भेडसावणारी एक ज्वलंत समस्या आहे आणि ती म्हणजे स्वच्छतागृहांची. स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग व जनसामान्यांची सोय व्हावी या उद्देशाने भारत विकास परिषदेने शहरात 'मोबाईल युरिनल व्हॅन' अर्थात फिरत्या स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. शहरातील या पहिल्या फिरत्या स्वच्छतागृहाचा उद्घाटन सोहळा ०६ डिसेंबर रोजी गांधी चौकात पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्यास महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास लातूरच्या सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विकास परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top