लातूर: जननायक संघटनेच्या माध्यमातून रेणापूर तालुक्यातील शेतकरी, ग्रामीण भागातील अडचणी व विकासाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जनसंवाद यात्रा काढून आजवर रेणापुर ५१ गावात संवाद साधला. या यात्रेला प्रत्येक गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक गावातील शेतकर्यांनी समस्या मांडल्या. अपुरी वीज, सक्तीनं केली जाणारी वीज बिलांची वसुली, शेतीमालाचे पडलेले भाव, त्यातून होणारी लूट यांचा त्यात समावेश होता. शेतकरी व जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कुणीही लोकप्रतिनिधी पुढे येत नाही याबाबत या संवाद यात्रेत संताप व्यक्त करण्यात आला.
अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना आणि ग्रामीण जनतेला एकत्र होऊन मोठा संघर्ष उभारण्याची गरज असून कोणत्याही पक्षाशी बांधील नसलेल्या व शेतकरी व ग्रामीण जनतेच्या प्रश्नासाठी, न्यायासाठी गतीने धडपडत असलेल्या जननायक संघटनेच्या पाठीमागे जनतेने ताकत उभी करावी असे असे आवाहन करण्यात आले. शिवाजी पाटील कव्हेकर या जनसंवाद यात्रेद्वारे अडचणी प्रत्यक्ष जाणून घेत असून त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच कर्जमाफी व सरकारच्या शेतकरी विरोधी भुमिकेत जनतेने अडकून न राहता शेतीवरच अवलंबून न राहता, आपल्या आर्थिक संपन्नतेसाठी नाबार्ड योजनेमार्फत शेतीपुरक व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती साधावी. महिला व तरूणांनी एमएनएस बँकेचे विनातारण व्यवसाय कर्ज घेवून ताठ मानाने, स्वाभीमानाने जगावे असा सल्ला शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी समसापुर, सुमठाणा, बिटरगाव, तसेच दवणगांव, वंजारवाडी, बावची येथील बैठकातून दिला. त्यामुळे जननायक संघटनेच्या जनसंवाद यात्रेतून भविष्यात नवीन राजकीय इतिहास घडण्याचे संकेत मिळत आहेत. या बैठकीला ग्रामीण भागातील जनतेचा मोठा पाठींबा प्राप्त होत आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Comments