HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्यात ३१ ब्लॅक स्पॉट, म्हणजे काय?

अपघात प्रवण ब्लॅक स्पॉटवर लक्ष करणार केंद्रीत, अपघात रोखणार


लातूर जिल्ह्यात ३१ ब्लॅक स्पॉट, म्हणजे काय?

लातूर: लातूर जिल्ह्यात आरटीओ, पोलिस आणि बांधकाम विभागाने ४६ अपघात प्रवण क्षेत्र निश्चित केले असून ३१ ब्लॅक स्पॉट ठरवले आहेत. ब्लॅक स्पॉट म्हणजे वर्षभरात ज्या ठिकाणी वारंवार अपघात होऊन दहा पेक्षा अधिकजण दगावले ते ठिकाण म्हणजे ब्लॅक स्पॉट. जिल्ह्यातील ३१ ब्लॅक स्पॉट याप्रमाणे....एमआयडीसी पोलिस ठाणे लातूर, बार्शी मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रीज, खाडगाव टी पॉईंट रिंग रोड लातूर, विमानतळ टी पॉईंट लातूर, लातुरच्या उड्डाण पुलावरील वळण, शिवाजी चौकातील उड्डाण पुलाखालील भुयारी रस्ता, बाभळगाव निटूर मार्गावरील डेअरीसमोरचा रस्ता, ममदापूर पाटी पेट्रोल पंपासमोर, महादेववाडी अहमदपूर, पाटील कॉलेजसमोर अहमदपूर, करडखेल शिवार, लोहारा शिवार, गंडी पाटी, दिग्रस पाटी, पांढरे मंगल कार्यालय लातूर, आष्टामोड पाटी, टोल नाक्याजवळ नांदगाव पाटी, अलगरवाडी पाटी लातूर, चापोली, तेलगाव पाटी लातूर, चाकूर कोर्टासमोर, पिंपळ फाटा रेणापूर, साखरा पाटी गातेगाव, कळंब रोड काटगाव, श्रद्धा ढाबा आणि पोल्ट्री फार्म औसा, हसाळा मोड औसा, शिंदाळा मोड भादा, किल्लारी पाटी, लामजना प्राथमिक आरोग्य केंद्र, ताडमुगळी वळण औराद, एमडीएम कॉलेजसमोर औराद. वारंवार अपघात होणार्‍या या ३१ ब्लॅक स्पॉटवर लक्ष केंद्रीत केले जाणार असून अपगात रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.


Comments

Top