HOME   लातूर न्यूज

लातूर मनपातर्फे ‘हॅपी म्युझिक’ शो

हासेगावचे विद्यार्थी करणार कला सादर, सर्वांसाठी खुला


लातूर मनपातर्फे ‘हॅपी म्युझिक’ शो

लातूर (आलानेप्र): जागतिक एडस् निर्मूलन दिनाच्‍या पूर्वसंध्‍येचे औचित्‍य साधून गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी लातूर शहर महानगरपालिका व सेवालय, हासेगाव यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने एचआयव्ही संक्रमित बालकांचा ‘हॅप्पी म्‍युजिक शो’ या सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी सायंकाळी ०६.३० वाजता आयोजित करण्‍यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत ठेवण्‍यात आला असून सेवालय, हासेगाव येथे राहणार्‍या एचआयव्ही संक्रमित बालकांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सामाजिक जवाबदारीच्‍या जाणीवेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमात सेवालयातील बालके आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमास महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर दे‍वीदास काळे, स्‍थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, सभागृह नेता अॅड. शैलेश गोजमगुंडे, विरोधी पक्षनेता अॅड. दीपक सूळ उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या खुल्‍या सांस्‍कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेऊन बालकांना प्रोत्‍साहन दयावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्‍त अच्‍युत हांगे यांनी केले आहे.


Comments

Top