HOME   लातूर न्यूज

कोपर्डी: अपप्रवृत्तींना जरब बसवणारा निकाल

पिडीतेला न्याय, न्याय व्यवस्थेवरील विश्वास दृढ- आ. अमित देशमुख


कोपर्डी: अपप्रवृत्तींना जरब बसवणारा निकाल

लातूर: कोपर्डी प्रकरणामध्ये न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाचा हा निकाल स्वागतार्ह असून यामुळे समाजातील अपप्रवृत्तींवर जरब बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रीया आमदार अमित देशमुख यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे पिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असल्याचे सांगून या प्रकरणात आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळणे आवश्यक होते. अपेक्षेप्रमाणे निकाल आल्यामुळे लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वासही दृढ झाला असल्याचे आमदार देशमुख यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रया व्यक्त करताना म्हटले. समाजात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी ज्याच्यावर अन्याय होतो त्यास जलदगतीने न्याय मिळणे आवश्यक असते. पोलीस विभाग आणि न्याय विभाग यांची यात महत्वाची भुमिका असते. कोपर्डी प्रकरणाच्या निकालाने निश्चितच गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसणार आहे. इतर गुन्हेगारी प्रकरणातही शासन आणि पोलीस विभागाने तत्परतेने कारवाई करून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष राहण्याची गरज निर्माण झालेली आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.


Comments

Top