HOME   लातूर न्यूज

क्लासेस परिसरात सीसीटीव्हीचे लोकार्पण

विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल, पोलिसांकडून कौतुक


क्लासेस परिसरात सीसीटीव्हीचे लोकार्पण

लातूर: चौगुले क्लासेसच्या संकल्पनेतून क्लासेस परिसरात विद्यार्थींनीच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. याचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून लातूर जिल्हा पोलिस अधिक्षक शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, पत्रकार धर्मराज हल्लाळे, पोलिस उपादधिक्षक प्रिया पाटील, आयडीयल इन्स्टीटुयट ऑफ बायोलॉजीचे संचालक दशरथ पाटील, जितेंद्र चव्हाण, विराज पालणकर, डॉ. शिवप्रसाद, बनवारीलाल जहागीर, प्रसाद पाटील, डॉ. राजू वानरे, प्रशांत सूर्यवंशी, राजू वाघमारे, गणेश चौगुले आदी उपस्थित होते.
चिरंजीव प्रसाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सुरुवातीला ब्लॅकमेलींगशी तडजोड केली तर भ्रष्टाचार वाढतच जातो. त्यामुळे भ्रष्टाचाराला कसलाही थोरा देवू नका, ही सवय आतापासूनच अंगिकारा. चौगुले सरांनी शिक्षणाबरोबरच समाजहितासाठी क्लासेस परिसरातील महिला, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या उपक्रमाचे कौतुक करत, पोलिस विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो असे प्रसाद यांनी सांगितले. कायदा जनतेच्या हितासाठी आहेच, पोलिसही जनतेच्या तक्रारीची दखल घेतात, पत्रकार आपल्या परीने ते न्याय दरबारी पोहचवतात, पण कोर्टात पुरावा लागतो. त्यादृष्टीने क्लासेस परिसर आता कॅमेर्‍याच्या निगराणीत आला असून जर वाईट प्रसंग ओढवलाच तर याचा सबळ पुरावा म्हणून महत्वाचे ठरणार असल्याचे चिरंजीवी प्रसाद म्हणाले. याप्रसंगी पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रतिक्षा जगताप या विद्यार्थीनीसह उपाधिक्षक प्रिती पाटील यांनी महिला व मुलींनी रोजच्या जीवनात वावरताना घ्यावयाची काळजी, कायदा व मोबाईलचा वापर याबाबत महत्वाची माहिती दिली.


Comments

Top