लातूर: बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवीन एटीएम सेवेचा शुभारम्भ आज कामदार रोड येथे बँकेचे झोनल मेनेजर महेश बंसवाणी यांच्या हस्ते करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र ही सामान्य माणसाची बँक म्हणून ओळखली जाते. आजमितीस बँकेच्या लातूर शहरामध्ये चार शाखा व चार एटीएम आहेत. बँकेची लातूरची मुख्य शाखा ही जवळपास ६० वर्षांपासून कामदार रोड येथे कार्यरत होती. मागील एक वर्षापासून बँकेच्या मुख्य शाखेचे स्थलांतर मिनी मार्केट चौकात झाले आहे. परंतु कामदार रोड येथे बँकेचे एक एटीएम असावे अशी मागणी बँकेच्या ग्राहकांकडून व व्यापारी वर्गाकडून होत होती. ग्राहकांच्या या मागणीनुसार बँकेच्या व्यवस्थापनाने नवीन एटीएम सेवेचा प्रारंभ कामदार रोड येथे केल्याचे बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक महेश बंसवाणी यांनी सांगितले. शहरातील सामन्य जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील व्यापारी, बँकेचे ग्राहक, मुख्य शाखेचे व्यवस्थापक सोमनाथन, बँकेचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
Comments