लातूर: रंगदोष (कलर ब्लाईंडनेस) मुळे विद्यार्थ्यांच्या भावी जिवनावर होणारा परिणाम टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांसाठी सात ठिकाणी कार्यशाळांचं आयोजन केलं जात आहे. चार डिसेंबरपासून सात दिवसांचा कार्यक्रम रोटरी क्लब होराईजन, नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाईंड, एमआयटी मेडीकल कॉलेज, रोटरी क्लब अहमदपूर-चाकूर-उदगीर, मिरागी नेत्रालय लातुरने जाहीर केला आहे. अनेक विद्यार्थी अथक प्रयत्न करुन एखाद्या सेवेसाठी मुलाखत देतो, त्याची निवडही होते पण वैद्यकीय चाचणीत तो कलर ब्लाईंडनेसमुळे अपात्र ठरतो. यामुळे नैराश्य येऊन तो टोकाचे पाऊलही उचलू शकतो, हे त्याच्या भावी आयुष्यासाठी घातक ठरु शकते, याबाबत आताच जागृती आणि तपासणी केली जावी यासाठी या कार्यशाळांचं आयोजन केलं जात असल्याचे रो. विठ्ठल कावळे, सुधीर सातपुते, डॉ. विजय राठी, लक्ष्मीनारायण कडेल, डॉ. संजय गवई, प्रा. गुणवंत बिरादार यांनी दिली. चार तारखेला औसा गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पाच तारखेला गटशिक्षणाधिकारी कार्यालय रेणापूर, सात तारखेला गटशिक्षणाधिकारी कार्यालय चाकूर आणि अहमदपूर, आठ तारखेला गटशिक्षणाधिकारी कार्यालय उदगीर, नऊ तारखेला गटशिक्षणाधिकारी कार्यालय निलंगा आणि ११ तारखेला दयानंद सभागृह लातूर या ठिकाणी या कार्यशाळा होणार आहेत.
Comments