HOME   लातूर न्यूज

कर्जमाफीसाठी लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मानले शासनाचे आभार

कर्जमाफीमुळे निर्माण झाला नवा आशेचा किरण!


कर्जमाफीसाठी लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मानले शासनाचे आभार

लातूर (आलानेप्र): राज्य शासनाने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यामध्ये मौजे रायवाडी ता. जि. लातूर येथील महिला शेतकरी म्हणाल्या की, राज्य शासनाचे जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्यामूळे काही वर्षापासून आमच्या नावांवर असलेले कर्ज माफ झाले असून दुष्काळाच्या व नैसर्गिक आपत्तीच्या काळात या कर्जमाफीचा लाभ झाल्याने आम्हा कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
तसेच मौजे गंगापूर येथील शेतकरी रघुनाथ साधू चव्हाण व शांतिनाथ ग्यानोबा नाथबोने यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत’ महाकर्जमाफीचा लाभ मिळाल्याने राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. आम्ही शासनाचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे उत्तम नागनाथ वाघमारे, मौजे पाखरसांगवी ता. जि. लातूर यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज माफ झाल्याने एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला असे मत व्यक्त केले. मौजे पाखरसांगवी येथीलच शेतकरी दिलीप विश्वनाथ लखादिवे यांनीही या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल राज्य शासनाचे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


Comments

Top