लातूर: महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून ऐतिहासीक कर्ज माफीमुळे शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील ही कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने महा कर्जमाफी असा शब्द वापरला आहे. या महा कर्जमाफीचा आकडा हजारो कोटीत आहे. यापूर्वी आंध्रप्रदेश सरकारने 15 हजार कोटीची कर्ज माफी दिली. तर पंजाब सरकारने 10 हजार कोटीची कर्जमाफी दिली, तसेच तेलंगणा सरकारने 10 हजार कोटीची कर्जमाफी दिली तर कर्नाटक सरकारने 8 हजार कोटीची कर्जमाफी दिली आहे. या सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा आकडा खूप मोठा आहे. म्हणूनच त्यासाठी महा कर्जमाफी हा शब्द सार्थ ठरत आहे.
या योजनेतील लाभार्थी शेतक-यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाप्रमाणेच लाभार्थी शेतकर्यांना सन्मानाने कोणतीही अट न ठेवता 1.5 लाख रु. पर्यंतची कर्जमाफी सरसकट मिळाली आहे. अलीकडेच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील आकडेवारी नुसार आज पर्यंत 77 लाख अर्ज प्राप्त झालेले असून छाननी अंतर्गत मंजूर झालेले अर्ज 69 लाख इतके असून या सर्व पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या सर्व शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु झालेली असून जवळपास 41 लाख शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करण्यासाठी शासनाकडून 19 हजार कोटीचा निधी बँकाकडे वर्ग केलेला आहे. या पध्दतीने राज्यातील सर्व पात्र शेतकर्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असल्याने शासनाकडून एक प्रकारचा दिलासा देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकरी 2009 ला कर्ज घेतले पण जुलै 2016 पर्यंत थकीत राहीलेले आहेत. असे सर्व शेतकरी या योजनेत पात्र लाभार्थी आहेत. 30 जुलै 2016 पर्यंत चे थकीत कर्ज मुद्दल व व्याजासह 1.5 लाख मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. 36 लाखापेक्षा जास्त शेतक-यांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी पुन्हा कर्ज घेण्यास पात्र असणार आहेत. हे 36 लाख लाभार्थी शेतकरी सोडून आणखी 5 लाख लाभार्थी शेतकरी असे आहेत की त्यांनी पुन्हा कर्जाची परतफेड म्हणून 10 हजार, 20 हजार ,किंवा 30 हजार रु भरले तर त्यांचापण सातबारा कोरा होण्यास मदत होणार आहे. म्हणून 40-41 लाख शेतक-यांचा सातबारा कोरा होईल आणि ते शेतकरी पुन्हा नव्याने कर्ज घेवू शकतील.
शेतकर्ना ऑनलाईन कर्जमाफी ही संकल्पना महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच आणली. ही कर्जमाफी ऑनलाईन असल्याने या योजनेचे लाभार्थी शेतकर्ची नावे व त्यांचे माफ झालेल्या कर्जाचे आकडे बेबसाईटवर स्पष्ट दिसणार आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी पारदर्शक असणार आहे. कर्जमाफी मध्ये चूक होण्याची शक्यता नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे.
ज्यांनी कर्ज परतफेड केली आहे त्यांच्यासाठी 28 जून 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण परतफेड केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रु. किंवा किमान 15 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास असे निदर्शनात येते की, या सरकारने सर्व ध्येय धोरणे ठरवून ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली आहे. ही कर्जमाफी पारदर्शक व महा कर्जमाफी नक्कीच आहे. पुढील कोणालाही कर्ज सहजरित्या उपलब्ध होईल याची तरतूद केली गेली आहे.
यामध्ये आणखी एक महत्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. कर्जमाफीपेक्षा कर्जमुक्ती यावर शासन भर देणार असून त्यासाठी शाश्वत उत्पन्न देणारी शेती व कृषी मालावर आधारित उद्योग या बाबींवर लक्ष केंद्रीत केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्यावर भर दिल्यामुळे ही योजना शेतक-यांच्या सन्मानार्थ असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना हे नाव अगदीच सार्थ ठरत आहे. शेतकर्यांनी या योजनेचा फायदा घेवून सन्मानाने जगावे.
दत्तात्रय परळकर, पत्रकार, लातूर.
Comments