HOME   लातूर न्यूज

विना परवाना पावती बुके छापणार्‍यांवर कारवाई करा- महापौर

महापौर सुरेस पवार यांनी दिले आयुक्तांना निर्देश


विना परवाना पावती बुके छापणार्‍यांवर कारवाई करा- महापौर

लातूर (आलानेप्र): शहरात अमृत योजने अंतर्गत जलवाहिन्यांचे काम सुरु आहे. सदर काम चालू असताना मनपाच्या नावाचा वापर करुन पावती बुक छापल्याचे काही दिवसापूर्वी मनपा प्रशासनाने निर्दशनास आणून दिलेले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महापौर सुरेश पवार यांनी या प्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहेत. अमृत योजनेअंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे काम सुरु असून या कामांच्या दरम्यान मनपाच्या नावाचा गैरवापर झाले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मनपाचा नावाचा गैरवापर केला असल्याचे प्रशासनाने निर्दशनास आणून दिले. सदर गंभीर बाब प्रशासनाने लक्षात घेऊन या प्रकरणी महापौर सुरेश पवार यांनी दोषींची तात्काळ चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी असे निर्देश आयुक्तांना दिले आहेत. मनपाच्या नावाने गैरकारभार किंवा गैरव्यवहार कदापी खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देऊन आगामी काळात यासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत या करिता प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा सूचना महापौर पवार यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.


Comments

Top