लातूर: पालकमंत्री संभाजी पाटील निलंगएकर यांच्या खुर्चीचा लिलाव आज होतोय. शिवसेना नेते अभय साळुंके यांनी पुढाकार घेत या आंदोलनाचं आयोजन केलं आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. यासाठी ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यासाठी कालच निलंगा येथे आले आहेत. याशिवाय सत्तार पटेल, राजकुमार सस्तापुरेही आले आहेत. संभाजी पाटील विरोधी पक्षात असताना शेतकर्यांच्या प्रश्नी त्यांनी वीज मंडळाच्या अधिकार्याच्या खुर्चीचा लिलाव केला होता. आता शेतकर्यांचे प्रश्न गंभीर असताना, संभाजी पाटील सत्तेत असताना शेत्कर्यांच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? असा प्रश्न करीत साळुंके यांनी हा लिलाव ठेवला आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी २१०० शेतकर्यांनी प्रत्येकी १०० रुपयांची अनामत भरली आहे. यात कॉंग्रेस नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांचाही समावेश आहे.
Comments