HOME   लातूर न्यूज

बाभळगावात स्वच्छतेचा जागर, वैशालीताईंनी घेतला आढावा

आरओ पाणी, वृक्षारोपण, हागणदारीमुक्ती, कचरा संकलन विविध उपक्रम राबवणार


बाभळगावात स्वच्छतेचा जागर, वैशालीताईंनी घेतला आढावा

लातूर: बाभळगाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याच्या दृष्टीने युध्द पातळीवर कामे केली जात आहेत. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी बाभळगावच्या स्वच्छतेचा आढावा घेऊन बाभळगाव स्मार्ट व्हिलेज करण्याच्या संदर्भाने विविध सूचना केल्या.
बाभळगावने ‘आरओ’चे शुध्द पाणी देण्यासाठीच एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘आरओ’चे शुध्द पाणी ग्रामस्थांना देणारे बाभळगाव हे या पंचक्रोशीतील पहिले गाव ठरले आहे. आता गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. गावातील कचरा संकलीत करून तो एका ठिकाणी डंप करणे, आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थाना आरोग्याच्या चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, गावात वृक्षारोपणाची मोहिम राबविणे, गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शौचालयाची उभारणी आणि त्याचा वापर याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करणे, शौचालय बांधणे आदी विविध उपक्रम माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाभळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. या सर्व उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या करिता लातूर लोकसभा युवक काँग्रेस तथा जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख सतत लक्ष देत असतात.
या विविध उपक्रमांचा आढावा विकास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. बाभळगाव स्मार्ट व्हिलेज व्हावे, याकरीता उपयुक्त सुचनाही त्यांनी दिल्या यावेळी बाभळगावचे सरपंच सतिश कुटवाडे, उपसरपंच अविनाश देशमुख, बाभळगावचे तलाठी कुलकर्णी, ग्रामसेवक बीव्ही कुंभार, सदस्या शांताबाई गोमारे, अरूणाबाई चौधरी, लक्ष्मीबाई स्वामी, सदस्य नुर शेख, नामदेव शिंदे, धनेगावचे सरपंच प्रताप पाटील, सरस्वती पाटील, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे आदी उपस्थित होते.


Comments

Top