HOME   लातूर न्यूज

मनसेनं केली बॅंकांच्या इंग्रजी फॉर्म्सची होळी


मनसेनं केली बॅंकांच्या इंग्रजी फॉर्म्सची होळी

लातूर: लातूर जिल्ह्यातील सर्व बँका शासन आदेश धाब्यावर बसवून आपले व्यवहार इंग्रजीतूनच करत असल्याने मनसेच्या वतीने या सर्व बँकांच्या इंग्रजी फॉर्मसची होळी केली. मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली अग्रणी बँक, खर्डेकर स्टॉपच्या समोर करण्यात मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर औताडे, जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी, लताताई गायकवाड, सचिन सिरसाट, रणवीर उमाटे, प्रमोद जोशी, मनोज अभंगे, बजरंग ठाकूर, अजय कलशेट्टी, किरण चव्हाण, अनिल जाधव, सतीश कदम, जहांगीर शेख, आकाश कलवले, शुभम स्वामी, अनिल पांढरे, बळवंत पौळ, राजाभाऊ शिंदे, गुणवंत सूर्यवंशी, मिना तांदळे, अक्षय चव्हाण आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बँकांत तसेच सर्वच कार्यालयात मराठी भाषेचा वापर नाही केला गेल्यास मनसेच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.


Comments

Top