HOME   लातूर न्यूज

क्षयरोग रुग्णांची माहिती प्रशासनाला कळविणे अनिवार्य

क्षयरोगाच्या मोफत औषधासाठी पाच दुकाने सुरू करणार


क्षयरोग रुग्णांची माहिती प्रशासनाला कळविणे अनिवार्य

लातूर: जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या कार्यालयात सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व लातूर केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शासनाने क्षयरोग हा नोटीफाईड आजार घोषीत केल्याने त्याबाबत रुग्णांची सर्व माहिती शासकीय यंत्रणेला कळविणे बंधनकारक केले आहे. जिल्हयातील सर्व ठोक क्षयरोग औषध विक्रेत्यांचा एक व्हाटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. जे किरकोळ औषध विक्रेते या औषधांची विक्री करतील त्यांनी बिलाची पावती व दुकानाचे नाव-पत्ता या ग्रुपवर दयावा. या किरकोळ विक्रेत्यांना नंतर क्षयेराग कार्यालयामार्फत महिना अखेर विचारणा केल्यानंतर त्यांनी ज्या रुग्णांना ही औषधे विक्री केली आहेत ती माहिती रुग्णाच्या मोबाईल नंबरसह देणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांनी या औषधाची विक्री डॉक्टरचे चिठ्ठीवर व बिलाद्वारेच करून त्याची नोंद शेडयुल एच ०१ रजिष्टर मध्ये करणे बंधनकारक आहे असे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन किगो चांडक यांनी सांगितले.
क्षयरोगावरील उपचाराची औषधे मोफत असून ती पुरवठा करण्यासाठी दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले. शहरातील विविध भागातील कांही निवडक दुकानदाराकडे ही औषधे मोफत वितरण करण्यासाठी क्षयरोग केंद्रातर्फे ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या १५ दिवसात लातूर शहरातील ०५ ठिकाणी अशी दुकाने सुरू करण्याचे ठरले. यावेळी डॉ. गंगाधर परगे जिल्हा क्षयरोग अधिकारी, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन चांडक व लातूर जिल्हा केमिस्ट संघटनेचे सचिव रामदास भोसले व पदाधिकारी जयप्रकाश रेडडी, दीपक वारद, नागेश स्वामी हे उपस्थित होते.


Comments

Top