मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेश लाहोटी
लातूर: स्वातंत्र्यांपूर्व काळात राष्ट्रीय भावनेने प्रेरीत होऊन स्थापन झालेल्या श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेशकुमार लाहोटी तर सचिवपदी अॅड. आशिष बाजपाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी तीन वर्षासाठी विश्वस्त व कार्यकारी मंडळाचीही निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष म्हणून राजेंद्रकुमार मालपाणी, सहउपाध्यक्ष दिनेश इन्नाणी, सहसचिवपदी शरद नावंदर, उपसहसचिव म्हणून लक्ष्मीकांत कर्वा, कोषाध्यक्षपदी ईश्वरप्रसाद डागा यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळात शांतीकुमार कुचेरिया, सुर्यप्रकाश धूत, कमलकिशोर अग्रवाल, संजय बियाणी, हुकूमचंद कलंत्री, बालकिशन बांगड, संजय भराडिया, सुहास शेट्टी, श्यामसुंदर खटोड, किशोर बी. भराडिया, विद्यार्थी प्रतिनिधीम्हणून आशिष अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर विश्वस्त मंडळात अध्यक्ष म्हणून लक्ष्मीरमण लाहोटी तर सदस्य म्हणून श्यामसुंदर भार्गव, डॉ. अनिल राठी, सतिषचंद्र चापसी, जुगलकिशोर उपाध्याय यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत सुरूवातीला संस्थेचे दिवंगत अध्यक्ष मुरलीधर इन्नाणी व ज्येष्ठ संचालक भागीरथ कलंत्री यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. श्रीकांत उटगे, सहाय्यक म्हणून अॅड. अमोल निबुरगे यांनी काम पाहिले. ज्येष्ठ सदस्य सत्यनारायण कर्वा यांनी नूतन पदाधिकार्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विश्वस्त लक्ष्मीरमण लाहोटी, माजी सचिव सत्यनारायण कर्वा, श्यामसुंदर भार्गव व नूतन सचिव अॅड. आशिष बाजपाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
Comments