HOME   लातूर न्यूज

महापौरांनी घेतला स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१८ च्‍या कार्याचा आढावा

अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी २४ तासात सोडवण्याचे आदेश


महापौरांनी घेतला स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१८ च्‍या कार्याचा आढावा

महापौरांनी घेतला स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१८ च्‍या कार्याचा आढावा
लातूर: देशात स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१८ च्‍या कार्याची सुरूवात झाली आहे. लातूर शहर महानगरपालिकेमार्फत पहिल्‍या १० महापालिका मानांकनात येणासाठी जोरदार प्रयत्‍न सुरू आहेत. स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१८ चे कार्य महानगरपालिकेच्‍या स्‍वच्‍छता विभागामार्फत सुरू आहे. त्‍याचे कार्य कोणत्‍या पध्‍दतीने सुरू आहे हे पाहण्‍यासाठी लातूर मनपाचे महापौर सुरेश पवार कार्यालयात कर्मचार्‍यांच्‍या कामाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्‍त अच्‍युत हंगे, उपमहापौर देविदास काळे, सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, नगरसेवक शैलेश स्‍वामी, सहायक आयुक्‍त त्र्यंबक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आढावा बैठकीमध्‍ये महापौर यांनी स्‍वच्‍छतेविषयक महापालिकेच्‍या वतीने करण्‍यात आलेल्‍या विविध उपाययोजनांबाबत शहरातील सर्व स्‍वच्‍छता निरीक्षक यांच्याकडून माहिती जाणून घेऊन विविध सूचना केल्‍या. स्‍वच्‍छता अॅपबाबतीत जास्‍तीत जास्‍त जनजागृती नागरिकांमध्‍ये व्‍हावी व नागरिकांनी स्‍वच्‍छता अॅप डाऊनलोड करून ज्‍या तक्रारी दाखल केलेल्‍या आहेत त्‍या तात्‍काळ २४ तासांच्या आत सोडविण्‍याचे आदेश दिले. नागरिकांच्‍या येणार्‍या तक्रारी कशा कमी होतील यासाठी मनपा प्रशासनाच्‍या वतीने प्रयत्‍न करावे असे सांगितले. शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्य करावे असे सांगितले. या आढावा बैठकीमध्‍ये सर्व विभाग प्रमुख, जन आधार संस्‍थेचे संजय कांबळे, सर्व स्‍वच्‍छता निरीक्षक व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.


Comments

Top