HOME   लातूर न्यूज

साखर कारखान्याच्या वजन काटे तपासणीसाठी भरारी पथक


साखर कारखान्याच्या वजन काटे तपासणीसाठी भरारी पथक

लातूर: जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यातील वजन काटे तपासणीसाठी एका भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकात वैद्यमापन विभाग, महसुल विभाग, पोलीस व प्रादेशिक सहसंचालक (साखर) व शेतकरी प्रतिनिधीचा समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या भरारी पथकातील प्रतिनिधीचे नाव, विभाग व संपर्क क्रमांक याप्रमाणे:
टीटी टेकाळे (वैदयमापन विभाग 9421047779), बीबी नेने (वैदयमापन 9766778836), एसजी पोतदार (महसूल 8225676921), गणेश वेडेगोटी (महसुल 9890675816), एबी चव्हाण (पोलीस 9011029872), एयु कुंडलवाडीकर (प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड 9422189909), हंसराज दत्तोबा जाधव (शेतकरी प्रतिनिधी 8485024555) या प्रमाणे हे पथक आहे. या पथकाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क ठेवून स्वयंस्फूर्तीने अचानक कारखाना स्थळावर भेटी देवुन तेथील वजनकाटे तपासणी करावयाची आहे. त्याबाबत अनुपालन अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर यांनी कळविले आहे.


Comments

Top