HOME   लातूर न्यूज

मोफत फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींग प्रशिक्ष्‍ाण


मोफत फोटोग्राफी व व्हिडीओ शुटींग प्रशिक्ष्‍ाण

लातूर: जिल्हा उद्योग केंद्र, लातूर पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ,लातूर यांच्यावतीने निलंगा येथे आयोजित अनुसूचित जातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी मोफत फोटोग्राफी व व्हिडीओ शुटिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे ०४ जानेवारी २०१८ पासून आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात फोटोग्राफी संकल्पना, व्हिडीओ संकल्पना, साधे फोटो डिजीटल करणे तसेच मार्केटिंग, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, विक्री कौशल्य, उद्योजकीय गुणसंपदा, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगाचे नियोजन व व्यवस्थापन, जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध कर्ज योजना या विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शासन पुरस्कृत प्रमाणपत्र व १००० रुपये विद्यावेतन नेट बँकीगद्वारे खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच स्वत:चा उद्योग सुरु करता यावा म्हणून प्रशिक्षणानंतर मार्गदर्शन केले जाईल. १९ ते ३५ वयोगटातील, अनुसूचित जातीतील किमान १० वी पास-नापास बेरोजगार युवक व युवतींना प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येईल. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी टीसी. जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, सेवा योजना कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅनकार्ड व ०३ पासपोर्ट फोटोसह कार्यक्रम समन्वयक एसपी रोळे मोबाईक क्रमांक 9028879728, एमसीईडी, द्वारा रुद्र फिल्म प्रोडक्शन ॲन्ड फोटो स्टुडीओ, कॉमप्युटर अकॅडमी, महाराष्ट्र शिक्षण समिती कॉम्पलेक्स, मेन रोड, निलंगा येथे ०३ जानेवारी २०१८ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, लातूर व प्रकल्प अधिकारी ,एमसीईडी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Comments

Top