HOME   लातूर न्यूज

सिध्देश्‍वर यात्रा महोत्सवाच्या मुख्य संयोजकपदी ज्ञानोबा कलमे

संयोजकपदी व्यंकटेश हालिंगे, विक्रांत गोजमगुंडे, प्रदीप पाटिल खंडापूरकर यांची निवड


सिध्देश्‍वर यात्रा महोत्सवाच्या मुख्य संयोजकपदी ज्ञानोबा कलमे

लातूर: लातूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी १३ ते २५ फेब्रुवारी या दरम्यान यात्रा महोत्सव पार पडणार असून या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांची बैठक पार पडली. देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत यात्रा महोत्सवाच्या मुख्य संयोजकपदी ज्ञानोबा कलमे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संयोजक म्हणून व्यंकटेश हालिंगे, प्रदिप पाटील खंडापूरकर व विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे. या बैठकीस देवस्थानचे सचिव अशोक भोसले व रमेशसिंह बिसेन, सुरेश गोजमगुंडे यांच्यासह विश्‍वस्तांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही यात्रा महोत्सव आणि त्यानिमित्त होणारे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. याच्या नियोजनासाठी देवस्थानच्या सभा मंडपात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. यावर्षीच्या ६५ व्या यात्रा महोत्सवाच्या सहसंयोजकपदी विष्णु साबदे, राजेश्‍वर अंकलकोटे, विजयकुमार सूर्यवंशी, रमेशअप्पा हालकुडे, श्रीराम भुतडा यांची निवड करण्यात आली. या बैठकीत विविध समित्यांची स्थापनाही करण्यात आली. त्यात झेंडा मिरवणूक समिती, सिध्देश्‍वर यात्रा स्टॉल समिती, पशु प्रदर्शन समिती, कृषी प्रदर्शन समिती, कुस्ती स्पर्धा समिती, भोजन समिती, भजन व किर्तन समिती, पुष्पवृष्टी समिती, अभिषेक समिती, क्रिडा स्पर्धा समिती, संरक्षण समिती, वीज व दिवाबत्ती समिती, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, स्वागत समिती, स्वयंसेवक समिती, प्रसाद वाटप समिती, पास दर्शन समिती, महिला बचत गट स्टॉल समिती, रचना व सजावट समिती, प्रसिध्दी समिती, सांस्कृतिक कार्यक्रम व कला महोत्सव समिती तसेच महिला स्पर्धा समित्यांची स्थापना करण्यात आली. पुढील बैठकीत सर्व समित्यांच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी करुन त्याची घोषणा केली जाणार आहे. या वर्षीचा यात्रा महोत्सव परंपरेला साजेसा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या महोत्सवाकडे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या बैठकीला विश्‍वस्त मंडळाचे पदाधिकारी सुरेश गोजमगुंडे, राजाभाऊ पतंगे, सूर्यकांत धायगुडे यांच्यासह महावीर काळे, ओमप्रकाश गोपे, गोरोबा लोखंडे, महादेव अंकलकोटे, उत्तमराव मोहीते, धनंजय बेंबडे, बहादुर पहेलवान, शिवाजी काळे, विजयकुमार सूर्यवंशी, विजयकुमार धायगुडे, राजेंद्र गोजमगुंडे,महादेव बन, विशाल झांबरे, बालाजी पिंपळे, उमाकांत पंचाक्षरी, राजकुमार पिटले, भारत नरके, गोपाळ बुरबुरे, रामलिंग ठेसे, पुष्पराज खुब्बा, राजेश्‍वर अंकलकोटे, भास्कर मोरे, भास्कर माने, प्रभाकर कांबळे, विष्णु साबदे, अजयकुमार चांडक, गोविंद जगताप, सचिन अलमले, प्रविण नाबदे, ओंकार सोनवने, पप्पू बोरे, महादेव खंडागळे, सागर लामतुरे, व्यवस्थापक दत्ता सुरवसे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व भाविक़ांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


Comments

Top