HOME   लातूर न्यूज

तावरजा प्रकल्पाजवळील शिल्लक जमीनीत उद्यान निर्माण करा- आ. भिसे


तावरजा प्रकल्पाजवळील शिल्लक जमीनीत उद्यान निर्माण करा- आ. भिसे

लातूर: उटी बु ता. औसा येथे असलेल्या तावरजा नदीवर बांधण्यात आलेल्या तावरजा मध्यम प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमीनीतील उटी व शिउर गावच्या परिसरातील जवळपास ६० ते ७० एकर जमीन सांडव्याखाली आहे. ही जमीन झुडपानी व्यापलेली आणि उजाडही आहे. उटी बु येथे देवीचे मंदिर आहे. दरवर्षी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी या ठिकाणी येतात. शासनाने तिर्थक्षेत्र म्हणून मंजुरी दिली आहे. या तावरजा मध्यम प्रकल्पाखाली वाढलेली झुडपे काढून पाटबंधारे विभागाच्या संपादित जमीनीत जायकवाडी प्रकल्प परिसरातील नाथ सागर उद्यानाप्रमाणे सुसज्ज असे उद्यान करून जनतेसाठी पर्यटनस्थळ म्हणून वन विभाग किंवा पाटबंधारे विभागाने विकसित करावे अशी मागणी आमदार त्र्यंबकनाना भिसे यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या उद्यानासाठी आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लातूर यांनी वनविभागास दिले. लातूर जिल्ह्यातील निसर्गरम्य असे उद्यान उटी बु येथे सहलीचे ठिकाण होणार आहे. या उदयानासाठी आवश्यक निधीच्या कामांना जिल्हा वार्षिक योजना निधीतून तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार त्र्यंबकनाना भिसे यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे केली.


Comments

Top