HOME   लातूर न्यूज

०४ ते १४ जानेवारी दरम्यान योगासन आणि प्राणायाम शिबीर


०४ ते १४ जानेवारी दरम्यान योगासन आणि प्राणायाम शिबीर

लातूर: आर्ष योग प्रतिष्ठान, पतंजली योग समिती लातूर, जेएसपीएम लातूर व एमएनएस बँक द्वारा ०४ ते १४ जानेवारी या काळात योगासन, आणि प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट ज्युनिअर कॉलेज मजगे नगर लातूरच्या प्रांगणात हे शिबीर होईल अशी माहिती माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर आणि विष्णू भुतडा यांनी दिली.
सकाळी ५.३० ते ०६ ध्यान, ०६ ते ०७ योगासने, ०७ ते ०७.३० स्टीम बाथ, दिनांक ०७ जानेवारी रोजी तेलमालीश, मठ्ठीस्नान, दिनांक १४ जानेवारी प्रातकाल शंख प्रक्षालन ठेवण्यात आले आहे.
हे सारे विधी स्वामी डॉ. देवव्रतजी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. या शिबराचा शुभारंभ दिनांक ०४ जानेवारी रोजी सकाळी ०७ वाजता जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.श्री.शिवाजीराव राठोड यांच्या शुभ हस्ते असुन महापैार सुरेश पवार व महादेव कुंभार वृत्‍तसंपादक पुण्य नगरी हे प्रमुख पाहूणे असणार आहेत. राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदजी यांचा १२ जानेवारी हा जन्म दिवसही युवा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या शिबीरामध्ये शहरातील सर्व योग प्रेमी संघटनाना सहभागी करून घेण्यात आले आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शहरातील शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालयाना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. जेष्ठ नागरीक विद्यार्थ्याना विशेष सवलत देण्यात आली आहे. महिलासाठी स्वतंत्र व्यवस्था व महिला शिक्षकाची सुविधा आहे. योगासन प्राणायाम शिबीरास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Top