HOME   लातूर न्यूज

०२ जानेवारीला लातुरातील डॉक्टरांचा १२ तासांचा बंद

मेडीकल बिलातील जाचक बदलांना विरोध, डॉक्टर्स करणार निषेध


०२ जानेवारीला लातुरातील डॉक्टरांचा १२ तासांचा बंद

लातूर: केंद्र सरकारच्या नॅशनल मेडीकल कमिशन बिलातील जाचक बदलांच्या निषेधार्थ देशभरातील वैद्यकीय व्यावसयिक मंगळवार ०२ जानेवरी रोजी सकाळी सहा ते सायंकाळी असा बारा तासांचा बंद पाळणार आहेत. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो. मात्र अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु असतील असे लातुरच्या आयएमएच्या शाखेने कळवले आहे. केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल मेडीकल कमिशन बिलांतर्गत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. त्याय डॉक्टरांचे प्रतिनिधी घटवण्यात येणार असून शासन नियुक्त प्रतिनिधी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारची चुकीची धोरणं पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देतानाही चुकीची धोरणे राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच नीटसारख्या समाईक परिक्षातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. याचा त्रास वैद्यकीय व्यावसायिकांसह विद्यार्थ्यांनाही होऊ शकतो. केंद्राचे हे नवे विधेयक ०२ जानेवारी रोजी संसदेत मांडले जाणार आहे. या लोकशाही विरोधी विधेयकाला विरोध करण्यासाठी आयएमएअने हा एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या दरम्यान निवेदन देऊन आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, सचिव डॉ. ओम भोसले आणि डॉ. अभय कदम यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान बाह्य रुग्ण विभाग बंद राहील. शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. अत्यावश्यकच असेल तर ही सर्व कामे आणि शस्त्रक्रियाही केल्या जाती असे संघटनेने कळवले आहे.


Comments

Top