लातूर : मराठी पञकार परीषद संलग्न लातूर जिल्हा मराठी पञकार संघाची अस्थायी समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी चंद्रकांत झेरीकुंठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या समितीत १५ सदस्याचा समावेश असून परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी हे निरीक्षक म्हणून काम पाहतील.
लातूर जिल्हा मराठी पञकार संघाची बैठक लातूर येथील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीला लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाच्या विविध प्रश्नांवर चचा॓ करण्यात आली. पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन करून संघाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला गेला. संघाची पुनर्बाधणी करताना लोकशाही पध्दतीनं निवडणुका घेऊन संघाची सूत्रे लोकनियुक्त पदधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यासाठी एक अस्थायी समिती नेमण्याचे एकमताने ठरले. अस्थायी समिती नव्याने सदस्य नोंदणी करेल. सदस्य नोंदणीनंतर रितसर निवडणुका घेतल्या जातील. ही सारी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण केली जाईल.
या अस्थायी समितीत अध्यक्षासह पंधरा सभासद राहतील. ही समिती परीषदेने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार काम करेल. परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी परिषदेच्या वतीने निरिक्षक म्हणून काम पाहतील. कोणत्याही मुद्यांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मराठी पत्रकार परिषदेचा असेल.
अस्थायी समिती- अध्यक्ष चंद्रकांत झेरिकुंठे, सदस्य - जयप्रकाश दगडे, अरुण समूद्रे, नरसिंह घोणे, विजयकुमार स्वामी, शशीकांत पाटील, अभय मिरजकर, दिपरत्न निलंगेकर, प्रा. सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, काकासाहेब घुट्टे, रमेश शिंदे, विजय देशमुख, निशांत भद्रेश्वर, प्रभाकर शिरुरे, श्रीनिवास सोनी. याबाबतची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी दिली.
Comments