HOME   लातूर न्यूज

ममता हॉस्पिटलचा ४१ वा वर्धापन दिन, बाह्यरुग्ण मोफत तपासणी

स्त्री रुग्णांसाठी सोनोग्राफी आणि इतर तपासण्यांमध्ये सवलत देणार


ममता हॉस्पिटलचा ४१ वा वर्धापन दिन, बाह्यरुग्ण मोफत तपासणी

लातूर: मागील ४० वर्षांपासून लातूर शहरात उत्तम रुग्णसेवा देणाऱ्या ममता हॉस्पिटलचा ०९ जानेवारी रोजी ४१ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने मूत्ररोग, अस्थीरोग आणि स्त्रीरोग रुग्णांसाठी मोफत बाह्यरुग्ण तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ अमोल लोंढे, डॉ नितीन सास्तुरकर, डॉ. आरव्ही कुलकर्णी, डॉ प्राची रुईकर, डॉ रामेश्वरी आलहबादे हे डॉक्टर्स रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. ०९ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ०९ ते ०५ या वेळेत येणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय स्त्री रुग्णांसाठी सोनोग्राफी आणि इतर तपासण्यांमध्ये सवलत देण्यात येणार आहे. ममता रुग्णालयाचा लोकसेवेसाठी लातुरात कायम तत्पर सेवा देणारे रुग्णालय म्हणून लौकिक असून राष्ट्रहितासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या कुटूंब नियोजनाची २००० शस्त्रक्रिया रुग्णालयाने मोफत केल्या आहेत. ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत रुग्णतपासणीचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी केले आहे.


Comments

Top