लातूर: गौंड व राजगौंड समाज हा प्रामाणिक आणि कष्टालू आहे. त्यांना हक्काचे घर आणि निवारा मिळवून देणे आवश्यक होते. आज त्यांच्या नावाने जागा करुन दिली आहे. आगामी काळात येथे सर्व सोयीनीयुक्त वसाहत उभारली जाईल असे आश्वासन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिले. बाभाळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने बाभळगाव हद्दीतील वैशालीनगर येथे गौंड व राजगौंड समाजाच्या कुटुंबास कबाले वाटप, जातप्रमाणपत्र वाटप व घरकुल बांधकामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर पंचायत समितीच्या सभापती शितलताई फुटाणे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. विक्रम हिप्परकर, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, संतोष देशमुख,दत्ता शिंदे, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष दगडुसाहेब पडिले, प्रविण पाटील, बाभळगावचे सरपंच सतिश कुटवाडे, हरिराम कुलकर्णी, सुपर्ण जगताप, सिकंदर पटेल, संजय ओहळ, प.स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, महादेव मुळे, उपजिल्हाधिकारी डॉ.प्रदिप मरवाळे, नायब तहसीलदार पालेवाड,बीडीओ दाजी दाइंगडे, सुभाष जाधव, बाभळगावचे तलाठी कल्याण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते घरकुल उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उपसरपंच अविनाश देशमुख यांनी आमदार अमित देशमुख यांनी गौंड व राजगौंड कुटुंबियांना कबाले आणि घरकुल मिळवून दिले यासाठी गौंड व राजगौंड समज व ग्रामपंचायतीच्यावतीने आभार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान आमदार देशमुख यांच्या हस्ते २१ गौंड व राजगौंड कुटुंबियांना कबाले आणि जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी गौंड वराजगौंड व वैशालीनगर तसेच बाभळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी व यांचासह पंचक्रोशीतील बाभळगाव, वैशालीनगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments