HOME   लातूर न्यूज

सरकारकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाही- आ. अमित देशमुख


सरकारकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाही- आ. अमित देशमुख

लातूर: राज्यातले आणि देशातले सरकार शेतकरी आणि सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करीत नाही. त्यामुळे या सरकारकडून फारशा अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेती उत्पादन करण्याबरोबरच स्वत:च कंपन्या स्थापन करून व्यापारी व उद्योजक बनले पाहीजे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांनी केले. कातपूर येथील कातपूर अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लि. या शेतकऱ्यांच्या कंपनीने येथे बांधलेल्या नवीन गोदामाचे उद्घाटन आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य साक्षरता मिशनचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, जयसिंगराव देशमुख, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, विलास साखरचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, लातूर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी फेडरेशनचे चेअरमन मोहनराव भिसे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडीले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, सहदेव मस्के, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सचिन दिग्रसे, सीडी पाटील, राजकुमार मोरे, तालुका कृषी अधिकारी वीर, बँक ऑफ बडोदाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Comments

Top