लातूर: सोयाबीनला अत्यंत कमी भाव आल्याने शेतकरी धास्तावले होते. काही काळजी करु नका, विकण्याची घाई करु नका, सोयाबीनला चांगला भाव येणार आहे असे महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सतत सांगत होते. त्यांचा शब्द खरा ठरला आहे. सुरुवातीला २४०० रुपयानं विकल्या गेलेल्या सोयाबीनला आज ३२३२ रुपयांचा भाव आला आहे. खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानं सरकारला जवळपास १५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. शिवाय भारतातल्या सोयाबीनला किंमत येऊ लागली. आज ३२३२ रुपये भाव आला. अजून भाव वाढतील ते ३५०० रुपयांपर्यंत जातील असे पटेल यांनी आजलातूरशी बोलताना सांगितले. शेतकर्यांना हवा असलेला भाव नक्कीच मिळेल, त्यांचे समाधान होईल. जानेवारी संपेपर्यंत किमान ३४०० चा भाव येईल. गाडी दमानं चालतेय पण हव्या असलेल्या ठिकाणावार नक्की पोचेल असेही ते म्हणाले.
Comments