लातूर: बहुचर्चित कल्पना गिरी प्रकरणातील सह आरोपी समीर किल्लारीकर याच्या वतीने लातूरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने या अर्जावरील निर्णय राखून ठेवला असून त्या संदर्भात पुढील सुनावनी २५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती सरकारी वकीलांनी दिली आहे. कॉंग्रेस कार्यकर्ती कल्पना गिरी बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयच्या मार्फ़त करण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान या गुन्ह्यातील सहआरोपी समीर किल्लारीकरच्या वतीने मुंबई येथील अॅड. देशपांडे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. या प्रकरणातील सीबीआयचा तपास पुढे सरकत नसल्यामुळे आरोपींना आणखी किती दिवस तुरूंगात रहावे लागेल अशी बाजू देशपांडेनी मांडली होती. त्यावेळी न्यायालयाकडे कोणतीही मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली नव्हती. समीर किल्लारीकरच्या वतीने जामिनासठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने या संदर्भात कोणताही निर्णय दिला नाही. पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सुनावणीच्या वेळी सीबीआयचे दोन अधिकारी व वकिलांची उपस्थिती होती.
Comments