विलासनगरः येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगामात ६७ व्या दिवसाखेर एकूण ०३ लाख १६ हजार ९७० मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले असुन ०३ लाख ३१ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी १०.७६ टक्के साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याचे संस्थापक, लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या व आ. दिलीपराव देशमुख व आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ०३ लाख ३१ हजार ३०० क्विंटल साखरेबरोबरच कारखान्याच्या १८ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पांतर्गत उत्पादीत झालेल्या वीजेपैकी ०१ कोटी ७७ लाख २७ हजार युनिट विजेचा पुरवठा महावितरणला करण्यात आला. कारखान्याच्या आसवानी प्रकल्पात २० लाख २१ हजार १९२ लीटर मद्यार्काचे ५७ हजार १६६ लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. कारखान्याच्या सेवेत कार्यरत असलेल्या कायम व हंगामी कर्मचारी व कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार नवीन वर्षाच्या सुरवातीस १५ टक्क्याची वेतनवाढ देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेऊन कर्मचार्यांनाही नवीन वर्षाची भेट दिली आहे.
Comments