लातूर: बाभळगाव येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची निवड झाली आहे. मावळत्या संचालक मंडळाच्या स्नेहमेळाव्यात बोलताना माजी मंञी दिलीपराव देशमुख यांनी नवी पिढी सामाजिक मुल्यांचा वारसा जपून ग्रामीण भागात अद्ययावत शिक्षणाची दारे खुली करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी ओमप्रकाश पाटील आणि गंगाधर सगर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव म्हणून देशमुख तर उपसचिव म्हणून महादेव जटाळ, कोषाध्यक्ष म्हणून नरसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली. संस्थेचे कार्यकारी सदस्य म्हणून सुवर्णा मुळे, सुर्यकांत देशमुख, अयुब महमद हनिफ शेख आणि मारूती मस्के यांची निवड झाली. अनेक वर्ष संस्थेचे अध्यक्षपद भूषवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष करून विद्यार्थींनींसाठी सहज सुलभ शिक्षणाची व्यवस्था करणारे माजी मंञी आमदार दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नूतन संचालकांकडे पदभार सोपवण्यात आला. यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, संभाजी रेड्डी, रामदास पवार, माजी कोषाध्यक्ष निवृत्तीराव तोडकर, गोविंदराव गोमारे, बाबूराव सगर, डॉ. सोपान जटाळ, जीवनराव देशमुख, बालासाहेब देशमुख, अशोक चौधरी उपस्थित होते. धीरज देशमुख यांनी यावेळी उपस्थित शिक्षक, प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी दयानंद शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Comments