HOME   लातूर न्यूज

रेणापूर पंचायत समितीच्या ११ जणांचा पगार कापला


रेणापूर पंचायत समितीच्या ११ जणांचा पगार कापला

लातूर: रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे यांनी काल सकाळी १० वाजता पंचायत समिती कार्यालयास भेट देऊन कर्मचार्‍यांच्या उपस्थितीचा पंचनामा केला.यावेळी ११ कर्मचारी उप्स्थित नसल्याचे दिसून आले. गैरहजर कर्मचार्‍यांचा ०१ दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश त्यांनी गट्विकास अधिकार्‍यांना दिले. सकाळी १० वाजत आल्यानंतर सभापतींनी पंचायत समितीच्या विविध विभागात जावून पाहिल्यानंतर ११ कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले. त्यांनी हजेरी पुस्तक घेऊन जे कर्मचारी गैरहजर होते. अशाची गैरहजरी टाकून त्यांचा ०१ दिवसांचा पगार कपात करावा असे लेखी पत्र गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांना देत या कार्यवाहीचा अहवाल द्यावा असे आगेश दिला. गैरहजर कर्मचार्‍यांमध्ये सहायक प्रशासकीय अधिकारी भारत काळे, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्ही.जी बुजुर्गे, विस्तार अधिकारी के.आर. भोसले, एल.एम.कांबळे, आय.सी. ईसपाडे, श्रीमती एस.बी. शिवलकर, बी.एस. साखरे, श्रीमती. एस.एस.पाटील, डी.आर.कापसे, व्ही.एस. परीट यांचा समावेश आहे.


Comments

Top