लातूर: केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या साडेतीन वर्षात सर्वच क्षेत्रात शेतकऱ्यांच्या बातीत अपेक्षा भंग झालेला असून हेच का अच्छे दिन? असा टोला सरकारला लगावत सर्वधर्म समभाव विचारांचा काँग्रेस पक्ष खरा विकास करु शकतो. येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत बदल घडवून करण्यासाठी जागृत रहा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व नूतन सरपंच व चेअरमन यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, रेणाचे चेअरमन आबासाहेब पाटील, एस.आर.देशमुख, जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, सर्जेराव मोरे, श्रीशैल्य उटगे, पृथ्वीराज सिरसाट, पंडीत धुमाळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, जिल्हा काँग्रेस मिडिया सेंलचे अध्यक्ष हरीराम कुलकर्णी, सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बिरबल देवकते, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर, उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, विजयकुमार पाटील, जयेश माने यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत शिरुरअनंतपाळ तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, चेअरमन, सदस्य यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, आमदार अॅड. त्र्यंबक भिसे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर बंडगर यांनी केले तर आभार आबासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रमास लक्ष्मण आवाळे, लक्ष्मण बोधले, काँग्रेस तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुधीर लखनगावे, संजय बिराजदार, दिलीप ढोबळे, सोमनाथ तोंडारे, धुमाळे, जिल्हा बँकेचे संचालक व्यंकट बिरादार, संभाजी सुळ, सौ.स्वंयप्रभा पाटील, भगवानराव पाटील विजयनगरकर, गोविंद भोपनीकर, राम गायकवाड, अशोक कोरे, सगरे, तांबोळी, मधुकर जाधव, सोनू डगवाले आदी उपस्थित होते.
Comments