HOME   लातूर न्यूज

कॉफी शॉप का बंद आहे हो? आलेल्या जोडप्यानं विचारलं!

पोलिसांची धाड पडली होती हे सांगताच ठोकली धूम!


कॉफी शॉप का बंद आहे हो? आलेल्या जोडप्यानं विचारलं!

लातूर: काल लातुरच्या अंबाजोगाई मार्गावरील ‘आठवण’ नामक कॉफी शॉपवर पोलिसांची धाड पडली. अनेकजण नको त्या अवस्थेत सापडले. आज या भागाचा आढावा घेण्याठी आम्ही गेलो. अंबा हनुमान मंदिरासमोरील एका छोट्या इमारतीत दुसर्‍या मजल्यावर हे शॉप आहे. तळमज्ल्यावर एक दवाखाना आहे. या कॉफी शॉपच्या पायर्‍या चढत असताना एक ‘जोडी’ पायर्‍या उतरत होती. त्यातल्या मुलीनं विचारलं, शॉप का बंद आहे हो? आम्ही सांगितलं काल धाड पडली होती. पुढे ज्या वेगानं या जोडीने पायर्‍या उअतरल्या त्याची गती पाहता यांची निवड ऑलिंपिकसाठी नक्की होऊ शकेल असं वाटून गेलं!
कॉफी शॉपच्या नावाखाली तरूण तरूणींना लॉजिंगची सुविधा उपलब्ध करून देणार्‍या अंबाजोगाई मार्गावरील एका कॉफी शॉपवर शनिवारी पोलिस पथकाने धाड टाकली. या ठिकाणावरून अर्धनग्न अवस्थेतील तरूण तरूणींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या धाडीत सापडलेल्या सहा सज्ञान तरूणींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. एका १७ वर्षीय विद्यार्थींनीस मात्र ताब्यात घेण्यात आले. कॉफी शॉप मालकांनी तरूण तरूणींना या ठिकाणी कंम्पार्टमेंट उभारून हवे ते करण्याची मोकळीक दिल्यामुळे महाविद्यालयातील जोडप्यांची मोठी गर्दी कॉफी शॉपमध्ये पहावयास मिळते. असाच प्रकार शहरातील अंबाजोगाई रोडवरील अंबा हनुमान समोर असलेल्या आठवण कॉफी शॉप मध्ये सुरू असल्याची माहिती शनिवारी पोलिस उपाधिक्षक शिलवंत ढवळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ढवळेयांच्या पथकाने दुपारी या कॅफेवर धाड टाकली असता आतमध्ये महाविद्यालयीन तरूण-तरूणी विवस्त्र अवस्थेत बसलेल्या आढळून आल्या. कॉफी शॉप चालकाने या तरूण-तरूणींना एका तासासाठी २०० रुपये दराने ‘जागा’ उपलब्ध करून दिली होती. या कारवाईत कॉफी शॉप चालक राजेंद्र जाधव, व्यवस्थापक महादेव गिरी, अनिकेत क्षिरसागर या तिघांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिस उपाधिक्षक कार्यालयात पीएसआय माधवी मस्के यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून वरील आरोपींविरोधात कलम ८, १२, १७ लैगिक अपराधापासून बालसंरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments

Top