लातूर: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान लातूकराच्या सेवेत नवीन रेल्वे सुरु करण्यात येतील असा विश्वास भाजपा नेत्यांनी दिलेला होता. हा विश्वास सार्थ ठरवत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून ०४ फेब्रुवारी पासून आठवडयातून तीन दिवस लातूर-यशवंतपूर (बेंगलोर) ही नवीन रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सुरु केल्याबद्दल भाजपा शहर जिल्हयाचे अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी मुंबई येथील सहयाद्री अतिथी गृहात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले.
लातूरकरांच्या सेवेत नवीन रेल्वे सुरु करण्याचा शब्द पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी दिलेला होता. हा शब्द खरा ठरविण्यासाठी पालकमंत्री निलंगेकर यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केलेला होता. त्यांनी केलेल्या या पाठपुराव्यामुळे ०४ फेब्रुवारी पासून लातूर-यशवंतपूर (बेंगलोर) ही रेल्वे आठवडयातून तीन दिवस लातूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. ही रेल्वे सुरु होत असल्याने भाजपा शहर जिल्हयाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृहात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपमहापौर देविदास काळे, मनपा स्थायी समिती सदस्य शैलेश स्वामी, संगीत रंदाळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे, बाबू खंदाडे यावेळी उपस्थित होते.
Comments