HOME   लातूर न्यूज

पानचिंचोलीत स्मशानात वृक्षारोपण, आशा-आरोग्य सेविकांचा उपक्रम


पानचिंचोलीत स्मशानात वृक्षारोपण, आशा-आरोग्य सेविकांचा उपक्रम

लातूर: पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत पानचिंचोली परिसरातील आशा महिला कार्यकर्त्यांनी व आरोग्य सेविकांनी स्वच्छ गाव- सुंदर गाव या उपक्रमामधून गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले आणि संवर्धनाची जबाबदारीही या कर्मचार्‍यांनी घेतली आहे. ज्यावेळी महिलांचे विचार व कार्यशक्ती जागृत होवून संघटीत होते. इतिहासाची पाने बदलेली आपण पाहिले आहेत असे गौरवोद्गार सुरेंद्र धुमाळ यांनी काढले. आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी गावाचा पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निश्चय यांनी केला आहे. यामध्ये आरोग्य सेविका सविता जाधव, आशा कार्यकर्त्या रमा कांबळे, सविता ढाबळे, जयश्री चौधरी आणि हणमंते वर्षा यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी अयोध्या चामे, सुरेंद्र धुमाळ, श्रीकांत साळुंके, जाधव उर्मीला, सुरेश अपसिंगेकर, डॉ. चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.


Comments

Top