HOME   लातूर न्यूज

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर मोर्चा


कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उपसंचालक कार्यालयावर मोर्चा

लातूर: राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महिन्याभरापासून आंदोलने चालु आहेत. याच पार्श्‍वभुमीवर विभागीय शिक्षक संघटना(जुक्टा)च्या वतीने १८ जानेवारीला टाऊन हॉल ते विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, लातूर गांधी चौक येथे दुपारी ०२ वा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात लातूर, उस्मानाबाद, नांदेड मध्ये शिक्षक सहभागी होतील. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यासाठी संघटनेमार्फत आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र शासनाने कोणताही प्रश्‍न सोडविलेला नाही. आंदोनलाचा तिसरा टप्पा म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुल्यांकन पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना त्वरीत अनुदान द्यावे, ०१ नोंव्हेबर २००५ नंतर नियुक्‍त सर्व शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करणे, ०२ मे २०१२ नंतर नियुक्‍त शिक्षकांना वैयक्‍तिक मान्यता द्यावी, २०११-१२ पासून वाढीव पदावरील शिक्षकांना मान्यता व वेतन द्यावे, २४ ऑक्टोबर २०१७ चा वरिष्ठ व निवड श्रेणींचा आदेश रद्द करावा या प्रमुख मागण्यासह मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जुक्टाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, प्रा. उदय पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, प्रा. सुधील अनवले, प्रा. शिवराम सुर्यवंशी, प्रा. संजय भंडारे, प्रा. मारूती सुर्यवंशी आदींनी केले आहे.


Comments

Top