HOME   लातूर न्यूज

मनसेनं दिला आयुक्तांना कंदील भेट!

पथदिवे बंद असल्याने संताप, अनोख्या पद्धतीने निषेध


मनसेनं दिला आयुक्तांना कंदील भेट!

लातूर: पथदिवे बंद असल्याने सध्या लातूर शहरातील मेन रोड, गल्ली बोळात अंधार आहे. याबाबत अडचणीवर मात करण्याचे सोडून याला आधीची राजवट कारणीभूत आहे असे महापौर सांगत आहेत, मात्र त्यावर इलाज करीत नाहीत. एकमेकावर आरोप करीत मनोरंजन करीत आहेत. सध्या मकरसक्रांत सण असल्याने महिलांना घराबाहेर कार्यक्रमानिमित्त जावे लागत आहे, त्यात शहरातील परिस्थिती ही अंधाराची असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. छेडछाड, गळ्यातील मंगळसूत्र, गंठन अशा मौल्यवान वस्तू जीव मुठीत घेऊन सांभाळाव्या लागत आहेत. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीनाही अंधाराचा त्रास होत आहे. या सर्व बाबींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. शहर काळोखात डुंबले असून शहरातील पथदिवे त्वरित चालू करुन पूर्ण परिसर प्रकाशमय करावा अशी मागणी मनसेने केली आहे. याचा निषेध म्हणून आयुक्तांना प्रकाश देणारा कंदील भेट देण्यात आला. यावेळी मनसेचे अ‍ॅड. अजय कलशेट्टी, महिला जिल्हा अध्यक्ष लताताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर औताडे, अ‍ॅड. बालाजी चापोलीकर, मुनवर सय्यद, प्रमोद जोशी, राजाभाऊ शिंदे, सरफराज सय्यद, अरुण नांदे, मनोज अंभगे, बजरंग ठाकूर, रवी सूर्यवंशी, विनोद खांडेकर, योगेश शिंदे, महादेव म्हेत्रे, कैलास खंडागळे, बंटी क्षीरसागर, यशपाल चौहान उपस्थित होते.


Comments

Top