लातूर: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई (ओ.बी.सी.) यांचे जिल्हा कार्यालय, लातूर यांच्या मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत लातूर जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. लातूर जिल्हयातील थकीत वसुलीबाबत सचिव, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी लातूर जिल्हयाचा आढावा घेतला. एकूण थकीत रक्कम रु. १८० लक्ष इतकी असल्याने थकीत लाभार्थीं, त्यांचे जामीनदार हमीपत्र / पगारपत्र धारकाचे वेतनातून कपात, गहाणखत (कर्ज बोजा नोंद) इत्यादींच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसुल कायदा १९६६ मधील तरतुदीनुसार आर. आर. सी. अंतर्गत कार्यवाही करुन वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.
महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशीर कार्यवाही करण्याचे कामकाज चालू झाले आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्हयातील थकीत लाभार्थींना महामंडळाकडुन ३१ मार्च २०१८ पर्यंत थकीत व्याज रक्कमेवर लाभार्थींना ०२ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेवून सर्व संबंधित लाभाथींनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करुन कर्जमुक्त व्हावे व कायदेशीर कार्यवाही टाळावी असे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Comments