HOME   लातूर न्यूज

परमेश्वर साखरेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाख

रमेश कराड यांच्या प्रयत्नांना यश, गंभीर दुखापत, परमेश्वरची स्थिती हलाखीची


परमेश्वर साखरेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाख

लातूर: गेल्या महिन्यात झालेल्या रस्ता अपघातात परमेश्वर मोहन साखरे (रा. गव्हाण, ता. रेणापूर) यांचा डावा पाय गंभीररित्या फ्रॅक्चर झाला होता. मात्र परमेश्वर साखरे यांची आर्थिक परस्थिती हालाखिची असल्याने त्यांना उपचार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे भाजप नेते रमेशअप्पा कराड यांनी परमेश्वर साखरे यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन त्यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत मिळवून दिली आहे.
दुचाकीवरुन जात असताना परमेश्वर साखरे यांचा रेणापूर फाटा येथे गेल्या महिन्यात अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा डावा पाय गुडघा व घोटयात गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान परमेश्वर साखरे यांना उपचारासाठी लातूर येथील आश्विनी ॲक्सिंडट हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. मात्र परमेश्वर साखरे यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना महागडे उपचार घेणे शक्य नव्हते. या विषयीची माहिती साखरे यांच्या नातेवाईकांनी रमेशअप्पा कराड यांना दिली. रमेशअप्पा कराड यांनी तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडे संपर्क साधून परमेश्वर साखरे यांच्या उपचारासाठी मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला.
दरम्यान परमेश्वर साखरे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले व ही रक्कम आश्विनी ॲक्सिंडट ॲण्ड न्युरो केअर सेंटर लातूर यांच्या नावे वर्ग करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी मिळालेल्या रकमेतून परमेश्वर साखरे यांच्या डाव्या पायावर आश्विनी हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया करुन यशस्वी उपचार करण्यात आले. सध्या परमेश्वर साखरे यांची तब्यत चांगली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.


Comments

Top