HOME   लातूर न्यूज

इ सौद्यामुळे सोयाबीनचे व्यवहार बंद, आज आडत्यांची बैठक

इ सौद्याबद्दल अनेक प्रश्न आणि अनेक शंका, कुणालाच उत्तर मिळेना


इ सौद्यामुळे सोयाबीनचे व्यवहार बंद, आज आडत्यांची बैठक

लातूर: लातूर जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून गणल्या जाणार्‍या आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या सोयाबीनचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शासनाने इ सौदा करणे बंधनकारक केल्याने व्यापार्‍यांनी आज सौदा काढला नाहे. इ सौदाही झाला नाही. शेतकर्‍याने बाजारात सोयाबीन आणल्यावर गेटवर त्याची नोंद करायची. संबंधित आडत्याकडे जायचे, हा आडत्या शेतकर्‍याचा भावानुसार इ सौद्यात भाव नमूद करणार. जिथे व्यवहार निशित होईल त्याला माल देणार साधारणत: असे या यंत्रणेचे स्वरुप आहे. या व्यवस्थेबद्दल शेतकर्‍यांसह सर्वांनाच अनेक शंका आहेत. त्यात विकलेल्या मालाचे पैसे कसे मिळतील ही मोठी शंका असल्याने व्यापार्‍यांनी सोयाबीनला हात लावला नाही. त्यामुळे आज सोयाबीनचा भावही निघाला नाही. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी आज बाजार समितीमध्ये संबंधितांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सचिव गुंजकर यांनी दिली.


Comments

Top