लातूर: महापालिकेची शुक्रवारी झालेली सर्वसाधारण सभा आयुक्त अच्युत हंगे यांनी बेकायदेशीर आहे, असे वक्तव्य केल्याने गोंधळ निर्माण होऊन गुंडाळली गेली. त्यानंतर दोन दिवसांनी ही सभा बेकायदेशीर होती, असे मी म्हणालोच नाही असा खुलासा हांगेनीं केला आहे. दरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर दोन दिवस लातूरात होते. त्यात सत्ताधार्यांनी सुत्रे हलवली, की आयुक्तांना खुलासा काढणे भाग पडले? दरम्यान याची चर्चा मात्र महापलिकेत जोरदार चालू आहे. महापालिकेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा होती. यात ही सभा कायदेशीर की बेकायदेशीर यावरती तब्बल दोन तास चर्चा झाली आणि सभेस सुरूवात झाली. त्यात आयुक्तांनी ही सभा बेकायदेशीर आहे असे म्हटले. आयुक्तांच्या या विधानाचा हवाला देत कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमकता दाखवत गोंधळ घातला होता. त्यानंतर लागलीच राष्ट्रगीत घेतले. आयुक्तांच्या वक्तव्यामुळे विरोधक खूश तर सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांत असंतोष पसरला होता. त्यात दोन दिवस पालकमंत्री लातूरात होते. सत्ताधार्यांनी सूत्रे हलवली आणि त्यानंतर आयुत्कांच्या खुलासा निघाला याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Comments