HOME   लातूर न्यूज

कर्जमाफीचा लाभ न घेतलेल्या शेतकर्‍यांना आवाहन

संबंधित बॅंकांशी ३१ जानेवारीपूर्वी संपर्क साधण्याची मुभा


कर्जमाफीचा लाभ न घेतलेल्या शेतकर्‍यांना आवाहन

लातूर: राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे ज्या शेतक-यांना आर्थिक लाभ मिळालेले नाहीत, अशा शेतकर्‍यांनी पीक कर्ज घेतलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित शाखा अथवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह ३१ जानेवारी पर्यंत संपर्क साधावा व आपले पात्रता अथवा अपात्रते बाबतची खातरजमा शेतकर्‍नी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक बीएल वांगे यांनी केले आहे. शेतकरी सन्मान योजनेद्वारे ज्या शेतकर्‍नी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले असतील परंतु ज्यांना या योजनेद्वारे अद्याप कोणतेही आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. अशा शेतकर्‍च्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीकृत बँकाच्या संबंधित शाखांमध्ये शाखनिहाय याद्या (न ताळमेळ झालेली) प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि अद्याप या योजनेअंतर्गत कोणताही आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. अशा शेतकर्‍यांनी पीक कर्ज घेतलेल्या आपल्याशी संबंधित लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा अथवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह (उदा: ऑनलाईन अर्ज, कर्ज खाते, उतारा, आधारकार्ड) ३१ जानेवारी पर्यंत संपर्क साधावा व आपले पात्रता अथवा अपात्रतेबाबतची खातरजमा संबंधित शेतकर्‍यांनी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर बीएल वांगे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


Comments

Top