लातूर: सुरेल गायन आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी नवयुवक मित्रमंडळ लातूरच्या वतीने अविष्कार महापुरूषांचा ‘जातीपातसे एक कदम आगे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुधवार २४ जानेवारी रोजी पंचशिल चौक जुना एमआयडीसी मार्ग लातूर या ठिकाणी सायंकाळी ०६ वाजता घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माजी राज्यसभा सदस्य तथा केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर हे चालू घडामोडीवर व्याख्यान देणार आहेत. उद्घाटक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अध्यक्ष माजी महापौर दिपक सुळ, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शिवाजी राठोड, महापौर सुरेश पवार, मनपा आयुक्त अच्युत हंगे, स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपुरकर आदींची उपस्थिती असणार आहे. यावेळी सुप्रसिध्द गायिका कल्पना पाटील औरंगाबाद, दशरथ शिंदे सोलापूर यांचे प्रबोधनपर गायन होणार आहे. महाराष्ट्र ही संत, महापुरूषांची भूमी आहे त्यांचे कार्य कोणत्याही एका विशिष्ट धर्म व जातीपातीसाठी मर्यादित नव्हते परंतू आज याच संत महापुरूषांना वेगवेगळ्या जातीपातीमध्ये विभागले जात असल्याचे चित्र दिसत आहे. याचा ओहापोह करणे याची जाणीव गायनाच्या माध्यमातून आणि ख्यातनाम विचारवंतांच्या व्याख्यानातून लोकांपर्यंत पोहवावी या उद्देशाने नवयुवक मित्र मंडळ लातूरने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी शहर तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष रत्नदीप सुरेश अजनीकर, सचिव अॅड.सचिन कांबळे, सदस्य प्रा. प्रविण कांबळे, कमलाकर सुरवसे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले आहे.
Comments