HOME   लातूर न्यूज

भूमी अभिलेख अधीक्षक शिरोळकरांची चौकशी सुरु

सरकारने नेमली समिती, मुख्यमंत्री मित्र नरेंद्र बोरा यांच्या प्रयत्नांना यश


भूमी अभिलेख अधीक्षक शिरोळकरांची चौकशी सुरु

लातूर: लातूरचे भूमी अभिलेख अधीक्षक विलास शिरोळकर यांच्या गैरकाराभाराची आणि भ्रष्टाचाराची सतत चर्चा व्हायची, त्यांच्याकडून अनेक शेतकर्‍यांवर अन्याय झाला पण त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मुख्यमंत्री मित्र नरेंद्र बोरा यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला. याची दखल शासकीय स्तरावर घेण्यात आली. आता या प्रकरणी एक समिती नेमण्यात आली असून ती चौकशी करीत आहे. या चौकशीमध्ये अनेक खुलासे होत आहेत. विधिज्ञ, शेतकरी, कर्मचारी आपले म्हणणे मांडत आहेत. एका विधिज्ञाने तर समितीसमोर प्रात्यक्षिकच करुन दाखवल्याचे वृत्त आहे. विलास शिरोळकरांच्या भ्रष्टाचाराविषयी नरेंद्र बोरा यांनी अनेकदा आवाज उठवला होता. वेळोवेळी माध्यमातूनही बातम्या प्रसारित झाल्या होत्या. २३ जानेवारी रोजी बोरा यांनी चौकशी समिती समोर आपले म्हणणे मांडले होते. ही चौकशी लावल्याबद्दल बोरा यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री लातूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचे आभार मानले आहेत.


Comments

Top