HOME   लातूर न्यूज

नगरसेविका जान्हवी सूर्यवंशी यांनी लुटले जनजागृतीचे वाण!


नगरसेविका जान्हवी सूर्यवंशी यांनी लुटले जनजागृतीचे वाण!

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठच्या भाजपा नगरसेविका जान्हवी सूर्यवंशी यांनी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जनजागृतीचे वाण देवून महिलांचे प्रबोधन घडवले आणि लोकप्रतिनिधींना एक नवा पायंडा घालून दिला. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमास अनेक महिला येतात म्हणून नगरसेविका जान्हवी मनोज सूर्यवंशी यांनी लोकजागृतीचे वाण लुटण्याचा निर्धार केला. उपस्थित महिलांना त्यांनी सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, ओला व सुका कचरा वेगळा करणे, उघड्यावर कचरा न टाकणे, घंटागाडीतच कचरा टाकाणे, ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करण्यासाठी तीन डस्टबीन ठेवण्यात आल्या असल्याने त्याचा वापर करावा ज्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत, प्लॉस्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, एक व्यक्ती-एक झाड लावून त्याचे संगोपन म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे, मागील काळातील पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता प्रत्येकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन अनावश्यक वापर टाळावा. नळाला तोट्या बसवाव्यात, पाणी वाया जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक व खाजगी बोअरचा अनिर्बंध वापर टाळावा, आपल्या अंगण, छतावरील पाण्याचे पुनर्भरण करावे, पाणी आडवून जिरवण्याचा प्रयत्न करावा असे प्रबोधन केले. प्रबोधनात्मक आशयाचे बॅनर प्रभागात जागोजागी लावले. संक्रांतीचे वाण म्हणून कापडी पिशव्या देण्यात आल्या. ज्यावर झाडे, पाणी आणि कचरा या बाबतीत जनजागृती करणारा संदेश आहे, या कार्यक्रमाला प्रभागातील भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Comments

Top