लातूर: ‘पद्मावत’ चित्रपटाने सबंध देशात अस्वस्थता निर्माण केल्यानंतर आज तो प्रदर्शित झाला. काल लातुरच्या तीन थिएटरमध्ये अचानक रिव्ह्यू शो दाखवण्यात आला. असाच शो देशभरात निवडक चित्रपटगृहात झाल्यानंतर प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. आज तो देशभर दाखवणं सुरु झालंय. लातुरच्या पीव्हीआर, रमा आणि यशोदा या तिनही चित्रपटगृहात त्याचे खेळ सुरु झाले आहेत. प्रतिसादही चांगला मिळत आहे. बुकींगलाही प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, लातुरात या चित्रपटाच्या विरोधात दोन आंदोलने झाली होती. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी बोलावणं धाडलं आहे. पुढचा बेत काय, आंदोलन करणार आहात का? वगैरे चौकशा सुरु झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान देशातील अनेक राज्यात अजूनही विरोध सुरु असून चार राज्यातील मल्टीप्लेक्सवाल्यांनी चित्रपट दाखवायचा नाही असा निर्णय घेतला आहे.
Comments