लातूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे संस्थापक आणि लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रिक्त अध्यक्षपदाची सुत्रे नवे अध्यक्ष अॅड. नामदेव काकडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅंड गोवाची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी अण्णाराव यांनी हा राजीनामा दिला. लवकरच या निवडणुकीसाठी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी वकील मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे असे अण्णाराव यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या निमित्ताने वकील मंडळात छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. यात अध्यक्षपद अॅड. नामदेव काकडे यांच्याकडे सोपवण्यात आले.
Comments