HOME   लातूर न्यूज

शुक्रवारी काँग्रेसची ‘लोकतंत्र बचाव-संविधान बचाव’ रॅली


शुक्रवारी काँग्रेसची ‘लोकतंत्र बचाव-संविधान बचाव’ रॅली

लातूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निर्देशानुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने २६ जानेवारी रोजी दुपारी ०३ वाजता ‘लोकतंत्र बचाव-संविधान बचाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष धिरज देशमुख हे सहभागी होणार आहेत. ही रॅली काँग्रेस भवन येथून निघणार असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोप होणार असल्याची माहिती शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी दिली आहे. या रॅलीमध्ये डॉक्टर्स, वकील, संविधान प्रेमी नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य्, सर्व सहकारी बॅकांचे पदाधिकारी, सारखर कारखान्याचे पदाधिकारी, सदस्य्, आजी-माजी नगरसेवक, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस, एनएसयुआय, शिक्षक काँग्रेस तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, सेवादल, विलासराव देशमुख युवा मंचच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी केले आहे.


Comments

Top