लातूर: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा विभागाचे गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा संघटक, अपंग-अव्यंग व्यक्ती अर्थ सहाय्य योजनेंतर्गतचे प्रोत्साहन देणा-या व्यक्तींचा तसेच जिल्ह्यात अवयवदान मोहीमेचा प्रारंभ करुन मोहिमेस गती देणार्या स्व. किरण लोभे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उपमहापौर देविदास काळे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अपर पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी (सामान्य), सुनिल यादव, यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वातंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments